ग्रामीण भागात असलेल्या पोहरा शेतशिवारात चरत असलेल्या शेळींवर वाघाने हल्ला करून एका शेळीची शिकार केल्याची घटना घडली. याबाबत चे वृत्त असे की शेतकरी आसाराम भोतमांगे यांनी पोहरा शेतशिवारात चाराईसाठी शेळ्या सोडल्या होत्या. अचानक वाघाने शेळींवर हल्ला करून एका शेळीची शिकार केली. या घटनेत शेतकऱ्याचे अंदाजे 20 हजार रुपयांचे नुकसान झाले घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. त्यावरून कर्मचारी यांनी घटनास्थळी पोहचुन पंचनामा केला .