गोंदिया: महानायक बिरसा मुंडा चौक,लेंडेझरी भव्य ओपन एकदिवसीय प्रौढ कबड्डी स्पर्धांचे आयोजन, आमदार विजय रहांगडाले यांची उपस्थिती
महानायक बिरसा मुंडा चौक,लेंडेझरी भव्य ओपन एकदिवसीय प्रौढ कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.प्रौढ कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील क्रीडापटूंना आपली कला सादर करण्याची उत्तम संधी मिळत असून,युवकांमध्ये क्रीडासंस्कृती व शिस्तीचे संस्कार रुजण्यास मदत होत आहे.असे प्रतिपादन आमदार रहांगडाले यांनी केले.यावेळी सभापती चित्रकला चौधरी,जि.प.सदष्य संजय टेंभरे,उपसभापती रामेश्वर महारवाडे, बँक संचालक दुर्गाप्रसाद ठाकरे होते.