बनावट आदेश तयार करून बीडमध्ये 241 कोटीचा भूसंपादन घोटाळा झाला, 73.4 कोटीचा अपहार झाल्याने 10 जणांवर गुन्हा दाखल
Beed, Beed | Nov 19, 2025 राष्ट्रीय महामार्गाच्या १५४ प्रकरणातील लवाद प्रकरणात जुन्या तारखा व तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे बनावट आदेश तयार करुन २४१.६२ कोटी रुपयांचा वाढीव मोबदला मंजूर केला.त्यातील ७३ कोटी रुपयांचे कोटी रुपयांचे वाटप झाल्याने तो अपहार झाल्याची तक्रार भूसंपादन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केल्यानंतर दहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आहेत. बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी अप्पर जिल्हाधिकारी, तहसलीदार महसूल आणि भूसंपादन कार्यालय बीड कार्यालयास भेटी दिल्या.