जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विविध मुस्लिम संघटनांनी राष्ट्रपतींना निवेदन सादर करून बाबरी मस्जिद पाडणाऱ्या समाजकंटकांना कठोर शिक्षा देण्याची मागणी आज शनिवार 6 डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता केली. तसेच उपासना स्थळ अधिनियम 1991 ची देशभरात कडक अंमलबजावणी करून, हा कायदा घटनेच्या नवव्या अनुसूचीत समाविष्ट करण्याची मागणी केली आहे.