औसा: मतदारसंघात ११ सिमेंट बंधाऱ्यांसाठी ९.३२ कोटी रु. निधी मंजूर ; आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नाला यश
Ausa, Latur | Mar 14, 2024 पिण्याच्या पाण्याचे स्रोत बळकट करणे, पावसाचे पाणी अडवणे, भूगर्भातील पाण्याचे पुनर्भरण करणे, खरीप आणि रब्बी पिकांना संबंधित सिंचनाची सोय उपलब्ध करून देणे, सुपीक जमीन प्रवाहात वाहून जाण्यास प्रतिरोध करणे हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून आमदार अभिमन्यू पवार यांनी बंधारे विकासाची कामे हाती घेतली असून त्यांच्या प्रयत्नातून औसा मतदारसंघातील ११ सिमेंट बंधाऱ्यांसाठी जलसंधारण महामंडळाकडून ९.३२ कोटी रु. निधी मंजूर झाला आहे.