स्थानिक सन्मती ज्ञानमंदिर इंग्रजी स्कूल येथे २८ नोव्हेंबर रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेच्या शिक्षिका नीता जैन यांनी जोतिबा फुले यांच्या प्रतिमेला हार अर्पण केला. तसेच विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक. शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक निलय बोन्ते यांनी केले.