पौष महिन्यातील पहिली अंगारकी संकष्ट चतुर्थी आणि नववर्षाची सुरुवात या दुहेरी निमित्ताने तालुक्यातील केळझर येथे मंगळवारी दि. ६ जानेवारीला सकाळ पासूनच भव्य धार्मिक यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली. सिद्धिविनायक गणपती मंदिरात दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. सकाळी ६ वाजता पासून मंदिर परिसरात भाविकांची ये-जा सुरू होती आणि संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणाने दुमदुमले होते.