जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारांनी प्रचाराचा जोर वाढवला आहे. अवसरी-पिंपळगाव जिल्हा परिषद गटातून विष्णूकाका हिंगे आणि पिंपळगाव पंचायत समिती गणातून शिवाजी निघोट यांनी आज एकलहरे गावामध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन करत प्रचार केला. यावेळी त्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या, ज्याला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.