भंडारा: 'ती' गाय प्लास्टिक खात होती... भंडारा नगरपरिषदेच्या दुर्लक्षावर संतप्त नागरिकाचा व्हिडिओ थेट 'सोशल'वर! <nis:link nis:type=tag nis:id=viral nis:value=viral nis:enabled=true nis:link/>
भंडारा येथील राजगुरू वार्डातील रस्त्याच्या बाजूला असलेल्या कचरा समस्येचा एक व्हिडिओ ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे, ज्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर भंडारा नगरपरिषद आणि स्थानिक राजकारण्यांच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. कचरापेटी बाजूला असतानाही, सर्व कचरा रस्त्यावर पडलेला असून, याच कचऱ्यातील प्लास्टिक पिशव्या एक गाय खाताना व्हिडिओमध्ये दिसत आहे.