आज दिनांक ३० नॉव्हेंबर २०२५ रविवार रोजी प्राप्त माहीती नुसार मंगरूळपीर नगर परिषद निवडणुकीचा जोर दिवसेंदिवस वाढत असताना शहरातील उमेदवारांनी मतदारांच्या घरोघरी प्रत्यक्ष भेटीगाठींची मोहीम जोरात सुरू केली आहे. 'हात जोडून दारो- दारी' अशी वारी सुरू असून प्रत्येक उमेदवार मतदारांच्या दारात उभा राहून आपुलकीची छबी निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे..