बीड तालुक्यातील लिंबागणेश परिसरात मांजरसुंबा पाटोदा महामार्ग लगत महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना रस्त्यालगत बिबट्या दिसल्याची माहिती समोर आली आहे. या अचानक दिसलेल्या वन्यप्राण्यामुळे स्थानिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी काही वाहनचालकांनी बिबट्याचे हालचाली मोबाईलमध्ये कैद केले. हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला असून तरी नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.