आज दिनांक 15 जानेवारी संध्याकाळी पाच वाजता छत्रपती संभाजीनगरमधील गुजराती कन्या विद्यालयातील मतदान केंद्रावर आज गोंधळाची स्थिती निर्माण झाली. भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला. भाजपचे कार्यकर्ते मतदान केंद्र परिसरात कसे थांबले, असा सवाल उपस्थित करत शिंदे गटाच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाब विचारला. मतदान केंद्राच्या आतच काही कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरू झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी निवडणूक कर्मचाऱ्यांकडून दुजाभाव केला