वर्धा-नागपूर महामार्गावर जंगलापूर पाटीजवळ आज (सोमवार, दि. ५ जानेवारी) दुपारी साडेचारच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका कारने ट्रॅक्टरला मागून जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. प्रशांत सायंकार (वय ४५, रा. बोरगाव (मेघे), असे मृतकाचे नाव आहे. तर ऋषिकेश ढोढरे (वय ४०, रा. जामणी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहेत.