पवनी-गोसे डॅम मार्गावर १७ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास एका पट्टेदार वाघाचे दर्शन झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हा वाघ रस्त्याच्या मधोमध अत्यंत शांतपणे आणि रुबाबात बसलेला असताना, त्याच मार्गावरून जाणाऱ्या चारचाकी वाहनधारकांनी आपले वाहन थांबवून हा दुर्मिळ क्षण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. या व्हिडिओमध्ये वाघाचा राजेशाही थाट स्पष्टपणे दिसून येत असून, १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.