भंडारा: भंडारा नगरपरिषद निवडणुकीत मोठा पेच! EVM वरून राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे नावच गायब; ७ कर्मचारी निलंबित
या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासनाने तात्काळ कारवाईचे पाऊल उचलले आहे. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी सात कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. संबंधित विभागाच्या दोन जबाबदार अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर अधिक कडक कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.