भंडारा: महायुतीत भांडाराचा भडका!— फुके विरुद्ध भोंडेकर भ्रष्टाचाराची थेट तक्रार मुख्यमंत्री–उपमुख्यमंत्र्यांकडे
भंडाऱ्यात महायुतीतील दोन्ही आमदारांमधील वाढता वाद आता थेट राज्याच्या सत्तेच्या दाराशी पोहोचला आहे. नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी भाजपचे आमदार परिणय फुके यांच्या विरोधात तक्रारी मांडत कठोर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर आता नेमका उलट सूर लावत परिणय फुके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच भोंडेकर यांचा भ्रष्टाचार उघड केल्याचा गंभीर आरोप केला आहे.