तळेगाव ढमढेरे येथे बंद घराचे कुलूप तोडून घरातील अडीच तोळे सोने व पन्नास हजार रुपये चोरणाऱ्या चोरट्यासह चोरीचा मुद्देमाल घेणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.नवनाथ उर्फ मटक्या ईश्वर भोसले असे चोरी करणाऱ्या चोरट्याचे, तर धोंडीबा अर्जुन उगले असे चोरीचा मुद्देमाल घेणाऱ्या आरोपीचे नाव आहे.