आज दिनांक 29 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून गोरंट्याल कुटुंब निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचे पुत्र अक्षय गोरंट्याल आणि पत्नी संगीता गोरंट्याल यांनी आज आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहे. जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच ही महानगरपालिका निवडणूक होत आहे. या पहिल्याच निवडणुकीत भाजपकडून अक्षय गोरंट्याल आणि संगीता गोरंट्याल नगरसेवक पदासाठी आपले नशीब आजमावत असून दोघा