नाशिक: शहरातील सिंचन भवन येथे नदीजोड प्रकल्प कार्यालयाचे उद्घाटन संपन्न, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची उपस्थिती
Nashik, Nashik | Aug 3, 2025 नाशिक शहरातील सिंचन भवन येथे आज दि. 3 रविवार दुपारी दोन वाजता कोकण-गोदावरी नदीजोड प्रकल्पांना गती देण्यासाठी गोदावरी मराठवाडा विकास पाटबंधारे महामंडळाच्या अंतर्गत कोकण गोदावरी नदीजोड प्रकल्पाच्या कार्यालयाचे उद्घाटन जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंत्री छगन भुजबळ होते. तर व्यासपीठावर मंत्री माणिकराव कोकाटे, विधानसभे परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, मंत्री दादाजी भुसे, मंत्री नरहरी झिरवाळ आदी मान्यवर उपस्थित होते.