माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले यांनी जनसंपर्क कार्यालय, सडक अर्जुनी येथे नागरिकांच्या भेटी घेतल्या. आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी वेळ दिला. यावेळी त्यांनी अनेक निवेदने स्वीकारली आणि नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्यानंतर, संबंधित शासकीय अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधला. नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सोडवता याव्यात यासाठी अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश दिले.