समुद्रपूर: गिरड परीसरात दहशत निर्माण करणाऱ्या त्या वाघीण व तिच्या दोन पिल्यांचे वाटसरूना झाले दर्शन:मोबाईल मध्ये दृश्य कैद
समुद्रपुर: तालुक्यातील गिरड खुर्सापार परीसरात एक वाघीण तिचे तिनं बच्छडे व एक वाघ अश्या ५ वांघानी शेतीशिरात मुक्त संचार सुरू असल्याने शेतकरी ,शेतमजूर व नागरीकांमध्ये चांगली दहशत निर्माण केली आहे. काही वाटसरूना गिरड खुर्सापार रस्त्यावर वाघीण व तिच्या दोन बछड्याचे दर्शन झाले असून अनेकांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात या चौघांच्या हालचाली केद केल्या आहेत. एका वाघाला ३० डिसेंबर पर्यंत जेरबंद करण्याची परवानगी वनविभागाला मिळाली आहे.