मुळशी: लोणी काळभोरमधील जॉयनेस्ट वसाहतीत सात वर्षीय मुलाला चिरडले
Mulshi, Pune | Jan 19, 2026 लोणी काळभोर येथील जॉयनेस्ट वसाहतीत सायकल खेळणाऱ्या एका 7 वर्षीय मुलाला चारचाकीतील एमआयटीच्या मुलाने चिरडल्याची घटना घडली आहे. आज सोमवारी (ता. 19) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारस हि घटना घडली आहे.या अपघातानंतर चारचाकी चालकाला लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घेतले असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.