बीड जिल्हातील नादलगाव येथील आदिवासी समाजातील ग्रामरोजगार सेवकाला जातिवाचक शिविगाळकरून गावातील काही लोकांनी दोन्ही पाय मोडून मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. जालिंदर सुरवसे वय ३५ वर्षे याला घरात घुसून अश्रुबा उत्तम राऊत, गोविंद सखाराम राऊत, भगवान अश्रुबा राऊत, विष्णू अश्रुबा राऊत याच्यासह गावातील काही गुडांनी जालिंदर सुरवसे यांना घरातून बाहेर ओढून तु लय माजलास, तुला आम्ही सोडणार नाहीत, जिवे मारून टाकूत, तुझ्या कुटूबाला गावात राहू देणार नाही असे म्हणत मारहाण केली.