जाफराबाद: राजुर टेंभुर्णी मार्गावर दळेगव्हाण गावाजवळ व फाट्यावर टेम्पो व स्कुटीचा भीषण अपघात,1चा मृत्यू,20 जण जखमी
आज दि.18डिसेंबर 2025वार गुरुवार रोजी सकाळी10 वाजेच्या सुमारास जाफराबाद ता.राजुर टेंभुर्णी या मुख्य मार्गावर दळेगवान गावाजवळ व फाट्यावर टेम्पो व स्कुटीचा भीषण अपघात झाला आहे यामध्ये स्कुटी चालक याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर टेम्पोत असलेली20जण जखमी झाले आहे,स्कुटी चालकाला वाचवण्याच्या नादात हा भीषण अपघात झाला असून या अपघाताची नोंद टेंभुर्णी पोलीस ठाण्यात घेण्यात आली असून मयताची व जखमींची नावे कळू शकली नाही ,त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.