अंबरनाथ: बदलापूर पूर्व पोलिस ठाण्याबाहेर पोलिसांनी केला लाठीचार्ज
आज दिनांक २ डिसेंबर रोजी दुपारी १२ च्या सुमारास मतदानाच्या दिवशी बदलापूर पूर्व पोलिस ठाण्याबाहेर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. जमावाने अचानक गर्दी केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हे दिसू लागली. या पार्श्वभूमीवर, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना अखेर जमावावर सौम्य लाठीचार्ज करावा लागला.मतदान प्रक्रियेच्या वेळीच काही अज्ञात कारणांवरून नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले. पोलिसांनी त्यांना वारंवार शांततेचे आवाहन केले, मात्र जमाव ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता.