वर्धा जिल्ह्यातील परिसरामध्ये यंदा मोठ्याप्रमाणावर अतिवृष्टी झाली असली, तरी थंडीने रब्बी पिकांची उगवण उत्कृष्ट झाली आहे. सध्या थंडी वाढल्याने रब्बीतील गहू, हरभरा, तूर, या पिकांबरोबरच इतर पिक जोमात आली असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान पिकांना वातावरण अनुकूल असल्याने पुढील काळात पिकांचे उत्पन्न भरघोस मिळण्याची शेतकऱ्यांना आशा आहे. रब्बी पिकांच्या पेरणीवेळी अवकाळी जोरदार पाऊस झ