एका तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील आघुर शिवारात घडली.राम आत्माराम मछले वय 22 वर्षे राहणार उदरी जिल्हा बुलढाणा आहे घटनेतील मयत तरुणाचे नाव आहे. राम मछले यांनी मंगळवारी आघुर शिवारात भाड्याने राहत असलेल्या घरात गळफास घेतला. ही बाब लक्षात आल्यावर उपस्थितांनी त्याला वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दुपारी दाखल केले तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.