वेरुळ हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ असून सध्या घाटात तीव्र वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.उसाच्या ट्रॅक्टर-डबल ट्रॉली वाहतुकीमुळे अपघातांचा धोका वाढत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी पदाधिकाऱ्यांनी खुलताबाद पोलिस यांना निवेदन दिले.पर्यटकांची सुरक्षितता व सुरळीत वाहतुकीसाठी डबल ट्रॉली वाहतूक बंद करण्याची मागणी करण्यात आली.यावर लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले.