*बडनेरा परिसरात मनपाची प्लास्टिक-जप्ती मोहीम; नियमभंग करणाऱ्या डेअरीवर ₹५,००० दंड* *अमरावती, दि. ११ डिसेंबर २०२५* अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा-चांडक व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या आदेशानुसार तसेच वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव आणि सहाय्यक आयुक्त धनंजय शिंदे (झोन क्र. ४) यांच्या मार्गदर्शनाखाली आज झोन क्र. ४ अंतर्गत बडनेरा रोड व साईनगर परिसरात प्लास्टिक जप्ती व डस्टबिन तपासणी मोहिम राबविण्यात आली.