शहरातील प्रभाग क्रमांक ५ देवतारे लेआऊट परिसरात भरदिवसा घरफोडीची धाडसी घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी घरातील ४५ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याची तक्रार सेलू पोलिसात दाखल झाली आहे. ही घटना शुक्रवारी (ता. ९ जानेवारी) दुपारी १२ ते १ वाजताच्या दरम्यान घडली. याप्रकरणी सृष्टी समिंदर भोसले (वय २८, रा. देवतारे लेआऊट, सेलू) यांच्या फिर्यादीवरून सायंकाळी ६ वाजता गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अशी माहिती सेलू पोलिसांकडून देण्यात आली.