परळी: उपजिल्हाधिकारी कार्यालय येथे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास आजपासून सुरुवात
Parli, Beed | Oct 22, 2024 233 परळी विधानसभा मतदारसंघासाठी आज दिनांक 22 ऑक्टोंबर पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान आज पहिल्याच दिवशी 49 फॉर्म विक्री झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर यांनी सांगितले. तहसील परिसर कार्यालयात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाच्या वतीने तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान आज पहिल्याच दिवशी एका उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राजाभाऊ उर्फ धनराज श्रीरंग फड रा कनेरवाडी ता परळी यांचा अर्ज दाखल झाला आहे.