पुणे जिल्ह्यातील शिरूरपरिसरात पाच वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेत पीडितेला अखेर न्याय मिळाला आहे. एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला पुणे सत्र न्यायालयाने शुक्रवारी कठोर शिक्षा सुनावली.शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने या प्रकरणातील आरोपीला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा देऊन कोठडीत धाडले आहे.