दारव्हा: शहरातील नगर परिषद शाळा क्रमांक दोन येथे पालकमंत्री संजय राठोड यांनी बजावला मतदानाचा हक्क
दारव्हा शहरातील नगरपरिषद शाळा क्र. 2 येथे दि. २ डिसेंबरला दु. ३ वा. यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांनी शांततेत आपला मतदानाचा हक्क बजाविला. मतदान केंद्रावर पोहोचत त्यांनी नागरिकांना मोठ्या प्रमाणात मतदान करून लोकशाही बळकट करण्याचे आवाहन केले.