शरद पवार यांनी मंगळवारी इंदापूरात आ.भरणेंना इशारा दिला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस मधून मी एका माणसाला तिकीट दिलं निवडून आणलं त्यांना मंत्री केलं. मात्र सत्ता मिळाल्यानंतर तिचा वापर गोरगरीब जनतेच्या तरुणांच्या हितासाठी करायचा असतो मात्र तस त्यांनी केलं नाही. सरकारच्या योजनांचा लाभ त्यांनी व्यक्तीशा कसा घेता येईल असा प्रयत्न केला याच्याबद्दलची नाराजी आज इंदापूरकरांच्या मनात आहे. ती दुरुस्त करायची असेल तर अशा माणसांना त्यांच स्थान दाखवल पाहिजे असं पवार वाघ पॅलेस येथील कार्यक्रमात म्हटलेय.