माजलगाव: दिंद्रुड पोलीस ठाणे हद्दीत अभिनव शाळेजवळ पुलाला दुचाकीस्वार धडकल्याने जागीच ठार झाला
माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस ठाणे हद्दीत एक दुर्दैवी अपघात घडला आहे. अभिनव शाळेजवळ सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामाजवळ गुत्तेदाराच्या निष्काळजीपणामुळे एका तरुणाचा जीव गेला आहे. एम एच 20 ई एस 9919 क्रमांकाची मोटारसायकल घेऊन जात असलेला युवक अचानक ताबा सुटल्याने अपूर्ण पुलाला जोरदार धडकला. धडक इतकी भीषण होती की त्यातच मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. परिसरात कोणत्याही प्रकारची सुरक्षायोजना किंवा इशारा फलक नसल्याने हा अपघात झाल्याची आरोप केला आहे.