दारव्हा: शहरातील ३५ मतदान केंद्रावर होणार मतदान, निवडणूक निर्णय अधिकारी यांची माहिती
दारव्हा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या मंगळवार दि. २ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. शहरातील एकूण ३५ मतदान केंद्रांवर मतदार आपला हक्क बजावणार असून, प्रशासनाने सर्व तयारी पूर्णत्वास नेली आहे.