अंबाजोगाई: अंबाजोगाईच्या मंगळवार पेठ मध्ये महिलेचे दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यांना पकडून नागरिकांनी चांगला चोप दिला
Ambejogai, Beed | Oct 26, 2025 अंबाजोगाईतील मंगळवार पेठ परिसरात दोन चोरांनी एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि दोन हजार रुपये हिसकावले. मात्र, नागरिकांनी तात्काळ दोन्ही चोरांना पकडून जोरदार मारहाण केली. या दरम्यान एक चोर घटनास्थळावरून पसार झाला, तर दुसऱ्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. अंबाजोगाईकरांनी सतर्क राहावे आणि अशा गुन्हेगारांपासून सावध रहावे, अशी विनंती करण्यात आली आहे.