मुंबई: नवीन प्रस्तावित लव जिहाद प्रतिबंधक कायदा संदर्भात आमदार अबू आझमी यांनी प्रसारमाध्यमांना दिली प्रतिक्रिया
Mumbai, Mumbai City | Feb 20, 2025
फेब्रुवारी २०२५ मध्ये महाराष्ट्र सरकारने 'लव्ह जिहाद' आणि सक्तीच्या धर्मांतराविरोधात कठोर कायदा तयार करण्यासाठी एक समिती स्थापन केली. या निर्णयावर समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.अबू आझमी यांनी या प्रस्तावित कायद्याला विरोध दर्शविताना म्हटले की भाऊ तुझ्याच धर्मात लग्न कर तू उद्ध्वस्त होशील. त्यांच्या मते हा कायदा धार्मिक स्वातंत्र्य आणि वैयक्तिक अधिकारांवर आघात करतो. त्यांनी असा आरोप केला की,या कायद्याच्या माध्यमातून भाजप सरकार धार्मिक ध्रुवीकरण साधण्याचा प्रयत्न करत आहे.#लव जिहाद #विधायक अबू आझमी #समाजवादी पार्टी