शिरूर: रांजणगाव एमआयडीसी हद्दीतून शेतकऱ्यांचे शेळी-बोकडे चोरणाऱ्या दोन चोरट्यांना अटक
Shirur, Pune | Dec 29, 2025 रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून शेतकऱ्यांकडील शेळी व बोकड चोरणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना अटक केली. या कारवाईत आरोपींनी केलेल्या 5 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. गणेश कैलास ब्राम्हणे (वय-21) व सुनील अण्णाभाऊ माळी (वय 24, रा. दोघेही गव्हाणवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर), अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.