मुद्रेगाव येथे ३३ केव्ही वीज पोल पडून दोन एकर ऊस जळून खाक; ७ लाखांचे नुकसान जालना जिल्ह्यातील मुद्रेगाव येथे महावितरणच्या ३३ केव्ही उच्चदाब वीज वाहिनीचा पोल पडल्याने शेतात भीषण आग लागून दोन एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या आगीत सुमारे ७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मुद्रेगाव येथील शेतकरी दिपाली सुदर्शन राऊत यांच्या शेतावरून जाणाऱ्या ३३ केव्ही उच्चदाब वीज वाहिनीचा पोल अचानक पडला. हा पोल थेट उभ्या असलेल्या उसाच्या पिकात कोसळल्याने उसाने पेट घेतला आणि काही