कन्नड तालुक्यातील नांदगीरवाडी शिवारातील शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.न्यायप्रविष्ट असलेले अपील प्रकरण सुरू असतानाही चिकलठाण येथील मंडळ अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर फेर मंजूर केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.या फेरमंजुरीमुळे संबंधित शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक व कायदेशीर नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना अशी कारवाई कशी करण्यात आली, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.या संदर्भात शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी यांना लेखी निवेदन दिले आहे.