धुळे: मतपत्रिकांवर निवडणुकांसाठी आता जनआंदोलन हाच मार्ग"; कल्याण भवन येथे माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी साधला संवाद
Dhule, Dhule | Nov 28, 2025 धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांच्या वापराची मागणी पुन्हा जोरदारपणे केली असून, यासाठी जनआंदोलन हा एकमेव मार्ग असल्याचे ते कल्याण भवन येथील पत्रकार परिषदेत म्हणाले. मतपत्रिका हा कोणत्याही पक्षाचा नव्हे, तर लोकशाहीच्या पारदर्शकतेचा प्रश्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आणीबाणीविरोधी जनआक्रोशासारखीच लोकचळवळ उभी राहिल्यासच सरकारला मतपत्रिका लागू करण्यास भाग पाडता येईल, असे गोटे म्हणाले.