भंडारा: 'भावाच्या नावावरचा कलंक'; आमदार फुके यांच्यावर तुफान हल्ला : नागपूरच्या पार्सलची हकालपट्टी करा! – डॉ. अश्विनी भोंडेकर
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या पत्नी डॉ. अश्विनी भोंडेकर यांनी आपले प्रतिस्पर्धी डॉ. परिणय फुके (ज्याचा उल्लेख त्यांनी "नागपूरचे पार्सल" असा केला आहे) यांच्यावर तुफान शाब्दिक हल्ला चढवला आहे. आमदार पत्नी असल्याने माझ्यावर होणारी टीका टिप्पणी आणि शहरातील महिलांवर होणारे आक्षेप खपवून घेतले जाणार नाहीत, असा स्पष्ट इशारा देत "माझी एमबीबीएस आणि डीजीओची डिग्री ही माझ्या घामाची आणि मेहनतीची आहे," असे डॉ. भोंडेकर यांनी ठामपणे सांगितले.