धरणगाव तालुक्यातील नांदेड गावातील २८ वर्षीय तरूणाने शेतातील झाडाला गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना शनिवारी १७ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता समोर आली आहे. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रविंद्र योगराज धनगर वय २८ रा. नांदेड ता. धरणगाव असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.