हिंगणघाट शहरातील सेंट जॉन स्कूल परिसरात रात्रीच्या सुमारास उभ्या असलेल्या एका ट्रकला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार ट्रकमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे कॅबिनला आग लागल्याचा संशय आहे. मात्र आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा ट्रक हिंगणघाट येथील संकल्प ठोंबरे यांचा असल्याची माहिती आहे.घटनेची माहिती मिळताच हिंगणघाट नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले,