आज दिनांक 15 जानेवारी सकाळी 11 वाजता छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणुकीच्या दिवशी भाजप पक्षाकडून टी-शर्टच्या माध्यमातून अप्रत्यक्ष प्रचार केला जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला व पुरुष उमेदवारांनी केला आहे. एएनसी अंतर्गत भाजप उमेदवारांच्या समर्थनार्थ टी-शर्टवरून मतदारांनी कोणते बटन दाबावे याचा संकेत दिला जात असल्याचा दावा करण्यात आला. या आरोपांमुळे संबंधित परिसरात बराच वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.