मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने देवधानोरा येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
Dharashiv, Dharavshiv | Sep 20, 2025
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त देवधानोरा व चिंचोली (जाहागीर) येथे तेरणा ट्रस्टच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ५५० हून अधिक रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टरांकडून हृदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक-घसा, नेत्ररोग, बालरोग व अस्थिरोग आदी आजारांवर तपासणी झाली. शिबिराचा लाभ तब्बल ५७० नागरिकांनी घेतला. गंभीर आजार असलेल्या १५० रुग्णांना पुढील उपचारासाठी मुंबईत पाठवले जाणार आहेत.