आंबेगाव तालुक्यातील चिंचोडी लांडेवाडी ग्रामस्थांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. गेल्या २३ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बैलगाडा घाटाच्या (धावपट्टी) बांधकामाला अखेर सुरुवात झाली आहे. सर्वपक्षीय नेते आणि ग्रामस्थांच्या एकजुटीतून साकार होत असलेला हा घाट पुणे जिल्ह्यातील 'टॉप'चा घाट ठरेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.