श्रीगोंदा पंचायत समितीतील महिला बचत गट अपहार प्रकरणी अखेर गुन्हा दाखल अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या पाठपुराव्याला यश; अपहारित रक्कम निश्चित अहिल्यानगर (प्रतिनिधी)- श्रीगोंदा पंचायत समिती अंतर्गत महिला बचत गटांच्या माध्यमातून शासकीय निधीचे नियमबाह्य वितरण, आर्थिक अनियमितता व मोठ्या प्रमाणावर अपहार झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, चौकशीदरम्यान आढळून आलेली अपहारित रक्कम अंतिम करण्यात आली आहे. या प्रकरणी दोषी आढळलेल्या संबंधितांविरोधात बेलवंडी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल