वीर मरण आलेल्या शहीद जवानांच्या कुटंुबाबद्दल कृतज्ञता तसेच आदर व्यक्त करण्याच्या दृष्टीकोनातून शहीद जवानांच्या कुटंुबातील सदस्यांकरिता गडचिरोली पोलीस दल, पोलीस रुग्णालय, गडचिरोली व सहयोग हॉस्पिटल, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 05 जूलै 2025 रोजी ‘शहीद सैनिक आश्रित कुटंुब आरोग्य कल्याण योजनेच्या’ नोंदणी शिबिराचे आयोजन पोलीस मुख्यालय परिसरातील एकलव्य हॉल येथे करण्यात आले.